अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

बीडमध्ये गोळीबार एक ठार ! पवनचक्की प्रकल्प पुन्हा चर्चेत

बीडमधील पवनचक्की प्रकल्प पुन्हा चर्चेत; सुरक्षारक्षकांचा चोरट्यांवर गोळीबार, एक ठार


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    बीड जिल्ह्यातील लिंबागणेश परिसरात असलेल्या पवनचक्की प्रकल्पावर शुक्रवारी पहाटे घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडवून दिली आहे. चोरीच्या उद्देशाने प्रकल्पात घुसलेल्या चोरट्यांवर सुरक्षारक्षकाने गोळीबार केला. या गोळीबारात एक चोरटा जागीच ठार झाला असून इतर चोरटे फरार होण्यात यशस्वी झाले आहेत. ही घटना नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २३ मे शुक्रवारी पहाटे सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास घडली.

चोरट्यांचा मध्यरात्री प्रवेश, सुरक्षारक्षकांनी घेतली तत्काळ कृती

    प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे दोनच्या सुमारास काही अज्ञात चोरटे पवनचक्की प्रकल्पात चोरीच्या उद्देशाने शिरले. तेव्हा तेथे तैनात असलेल्या सुरक्षारक्षकाच्या हे लक्षात आले. चोरट्यांना रोखण्याच्या प्रयत्नात त्याने गोळीबार केला. गोळी लागल्यामुळे एक चोरटा जागीच ठार झाला. इतर चोरटे मात्र अंधाराचा फायदा घेत फरार झाले.


पोलिसांची तात्काळ कारवाई, तपास सुरु

    गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, पोलीस अधिक तपास करत आहेत. सुरक्षारक्षकाची चौकशी सुरू करण्यात आली असून, त्याने कायद्याच्या चौकटीत कारवाई केली का, याचा तपास केला जात आहे.



पवनचक्की प्रकल्पावर पुन्हा एकदा संशयाची सावली

   बीडमधील पवनचक्की प्रकल्प गेल्या काही महिन्यांपासून विविध कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. खंडणी, फसवणूक, स्थानिक वादविवाद, आणि गुन्हेगारी कृतीमुळे या प्रकल्पाकडे वारंवार लक्ष वेधले जात आहे. नुकत्याच घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने या चिंतेत अधिक भर टाकली आहे.


स्थानिकांचा सुरक्षेसाठी आग्रह

   या घटनेनंतर स्थानिक नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांनी पवनचक्की प्रकल्प परिसरात अधिक कडक सुरक्षा उपाययोजनांची मागणी केली आहे. तसेच, रात्रीच्या वेळी गस्त वाढविणे, सीसीटीव्ही व्यवस्थेत सुधारणा करणे, आणि प्रशिक्षित सुरक्षारक्षक नेमणे यासाठीही आवाज उठवला जात आहे.

    पोलीस याप्रकरणी सखोल तपास करत असून, चोरट्यांचा माग काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. घटनास्थळी मिळालेले पुरावे आणि मृत चोरट्याची ओळख पटवण्यासाठी फॉरेन्सिक तपास देखील सुरू करण्यात आला आहे.


Comments

Popular posts from this blog