अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

भीषण अपघात : मालवाहतूक ट्रकने २० फूट फरफटत नेलेल्या महिलेचा जागीच मृत्यू, पती गंभीर जखमी

 खूपच दुर्दैवी व हृदयद्रावक घटना 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

  आज २५ मे रविवारी रोजी एका हृदयद्रावक व दुर्दैवी अपघातात मालवाहतूक ट्रकने दुचाकीस्वार दाम्पत्याला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पत्नी करिष्मा आयास सय्यद (वय २४, रा. मुर्शदपूर, आष्टी) यांचा ट्रकखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. पती आयास सय्यद (वय ३०) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही

     ही दुर्दैवी घटना आज आष्टी शहरातील सावळेश्वर ट्रॅक्टर्ससमोर घडली. दुचाकी क्रमांक MH 20 BD 5701 वरून आयास सय्यद व पत्नी करिष्मा हे अहिल्यानगरच्या दिशेने जात असताना त्यांना मागून भरधाव वेगात आलेल्या मालवाहतूक ट्रक क्रमांक KA 39 6570 ने जोरदार धडक दिली. धडकेनंतर करिष्मा सय्यद ट्रकच्या चाकाखाली आल्या आणि तब्बल २० फूट अंतरावर फरफटत नेल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला अशी माहिती मिळाली. या भीषण प्रसंगात पती आयास सय्यद हे देखील जखमी झाले.

    घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तत्काळ मदतकार्य सुरू करून जखमी आयास सय्यद यांना आष्टी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलवण्यात आला व नंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

     या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. घटनास्थळी काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून ती सुरळीत केली.या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


Comments

Popular posts from this blog